पंजाब नॅशनल बँकेचा ब्रँड अॅम्बेसेडर आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली बँकेसोबतचा करार मोडण्याची शक्यता आहे.<br /> विराट सध्या दक्षिण आफ्रिकेत असला तरी पीएनबी घोटाळ्यातील घडामोडींकडे त्याचे लक्ष आहे.अन्य सेलिब्रिटीज प्रमाणेच विराटही आपल्या छबीबाबत सर्तक असून अशा कुठल्याही गैरप्रकारात आपले नाव न येण्याबाबत तो कायम दक्ष असतो.२०१६ साली पीएनबीचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून विराटची नियुक्ती झाली होती. ‘मेरा अपना बैंक’ या टॅगलाईन अंतर्गत विराटने बँकेचे प्रमोशन केले होते. सध्या जबरदस्त फॉर्मात असलेला हिंदुस्थानचा कर्णधार विराट कोहली हा देशातील मोठा ब्रँड आहे. त्याने करार मोडल्यास सध्या अडचणीत असलेल्या पीएनबीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.<br /><br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews